उद्देदेश :-
ह्यामध्ये मुख्यतः हायड्रोकार्बन्स असतात, ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि उर्जा उत्पन्न करतात. एका जैव-रासायनिक क्रियेमधून हा वायू उत्पन्न होतो. ह्या प्रक्रियेच्या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जैविक कचर्याचे रूपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न होत असल्याने ह्याला बायोगॅस असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

Add caption

साहित्य
बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. तरी ही, शेणाखेरीज कुक्कुटपालना मधील कचरा, शेतांमधील वाया जाणारा माल, नाइट-सॉइल (रात्री वाहून नेला जाणारा मैला) ह्यांचा ही वापर कच्चा माल म्हणून करता येतो.
फायदे
हे पर्यावरण महत्वपूर्ण इंधन आहे. बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेड्यापाड्यांमधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ह्या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्वरूप स्लरीदेखील निर्माण होते. तिच्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असल्याने तिचा खत म्हणून ही वापर केला जातो. शेणाच्या गोवर्या आणि लाकडे जाळून चूल पेटवताना निर्माण होणारा धूर आरोग्यास घातक असतो. बायोगॅसपासून असा काही धोका नाही. बायोगॅसच्या वापराने वातावरण स्वच्छ राहाते कारण ह्या प्रक्रियेमुळे माशा आणि इतर जंतूंना आकर्षित करणारे कचर्याचे उघडे ढीग साचून राहात नाहीत. बायोगॅसच्या वापराने सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे तोडली जाण्यापासून बचाव होतो.
बायोगॅस निर्मिती संयंत्राचे दोन प्रकार असतात
१) फिक्स डोम : हि टाकी नेहमी फिक्स असते
२) फ्लोटिंग डोम म्हणजे तरगती टाकी आहे
या मधील दोन्हीमधील एकसारख्या पद्धती
No comments:
Post a Comment